महेंद्र देव यांनी पदभार स्वीकारला   

नवी दिल्ली : इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी कुलगुरू आणि अर्थतज्ज्ञ एस. महेंद्र देव यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) नवे अध्यक्ष म्हणून शनिवारी पदभार स्वीकारला.ईएसी-पीएमचे पहिले अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे नोव्हेंबर २०२४ मध्ये निधन झाले. त्यानंतर, नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमर बेरी या पदाचा अतिरिक्त कारभार पाहत होते.
 
दोन दिवसांपूर्वी देव यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर, त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. देव यांची ईसी-पीएमच्या अध्यक्षपदाची नियुक्ती दोन वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत  असणार आहे.या परिषदेत सध्या संजीव सान्याल, संजय कुमार मिश्रा आणि शमिका रवी हे पूर्णवेळ सदस्य आहेत. तर नवीन अर्धवेळ सदस्यांमध्ये सौम्या कांती घोष यांचा समावेश आहे. इतर अर्धवेळ सदस्यांमध्ये राकेश मोहन, साजिद चिनॉय, नीलकंठ मिश्रा, नीलेश शाह, टीटी राम मोहन, के.व्ही. राजू, चेतन घाटे, पमी दुआ, पुलक घोष आणि गौरव वल्लभ यांचा समावेश आहे.

Related Articles